कोरोनावर मात करण्यासाठी शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाचा 'मोठा' निर्णय!  
मुंबई

कोरोनावर मात करण्यासाठी शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाचा 'मोठा' निर्णय!

मुकेश धावडे

वडाळा : गणेशोत्सव काळात दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांमधून विविध विषयांवर जनजागृती करणाऱ्या शिवडी पश्चिमेतील शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (शिवडीचा राजा)  यंदा 11 दिवसांऐवजी दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यंदा फेसबूक, युट्यूब अशा आॅनलाईन पद्धतीने मंडळ देखावे सादर करणार असून मंडळाची मुर्तीही 3 फूट उंच शाडूची असणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच, कोरोना संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. 

लोकमान्यांचा वारसा जपणारे  मंडळ  म्हणून ओळख असलेल्या शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक जबाबदाराची भान ठेवत आज हा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात मंडळाच्या सदस्यांची सोमवारी (ता. 20) बैठक झाली होती.  विशेष म्हणजे, यंदा सार्वजनिक वर्गणी जमा न करण्याचा संकल्पदेखील मंडळाने केला आहे. सामाजिक देखाव्यांची परंपरा कायम राखण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून देखावा सादर करण्यात येणार आहे. तसेच, यंदा पाद्मपुजन कार्यक्रम आणि मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर यांनी दिली.

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत
कोरोनाच्या संकटाविरूद्ध लढण्यासाठी शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला   देण्यात आला आहे. मंडळातील हातावर पोट असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात मदत,  उत्सव कालावधीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर तसेच जनजागृती यासारखे उपक्रम प्राधान्याने राबवणार आहोत, असे मंडळातर्फे सांगण्यात आलले आहे.
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT