कर्ज मिळवून देतो म्हणाले, अन्‌ लाखो रुपये घेऊन झाले पसार!
कर्ज मिळवून देतो म्हणाले, अन्‌ लाखो रुपये घेऊन झाले पसार! 
मुंबई

कर्ज मिळवून देतो म्हणाले, अन्‌ लाखो रुपये घेऊन झाले पसार!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीमध्ये रक्कम गुंतवल्यास प्रत्येक सभासदाला विनापरतावा २० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज अथवा व्यवसाय कर्ज मिळेल, असे प्रलोभन दाखवून एका जोडप्याने पनवेल व आसपासच्या परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना तब्बल ५३ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

मुकरम अली अन्सारी, रेखा कांबळे असे या जोडप्याचे नाव असून, खांदेश्‍वर पोलिसांनी या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत मुकरम अन्सारी याला अटक केली. आरोपी मुकरम व रेखा या दोघांनी २०१७ मध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची फायदेशीर योजना असल्याचे सांगून नागरिकांना सभासद होण्यास भाग पाडले. त्या वेळी मुकरम अन्सारी हा अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचा मालक असल्याचे; तर रेखा कांबळे ही या कंपनीची समूह संचालक असल्याचे सांगितले होते. 

कंपनीत सभासद होण्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये ठेव म्हणून जमा करावी लागते. तसेच सभासदांकडून स्वीकारलेली रक्कम कंपनीकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. कर्ज मिळेल या आशेने काही गुंतवणूकदारांनी या जोडप्याकडे लाखोंच्या पटीत; तर काहींनी हजारोंच्या पटीत रक्कम भरली. अशा पद्धतीने या जोडप्याने ११७ लोकांकडून तब्बल ५३ लाख ६२ हजाराची रक्कम उकळली. या रकमेचा अपहार करून या दोघांनी पलायन केले. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी अल्फा गोल्ड कंपनीची अधिक माहिती काढली असता अशा प्रकारची कोणतीही फायनान्स कंपनी अस्तित्त्वात नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर फसवणूक झालेल्या ११७ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT