Thane
Thane 
मुंबई

ठाण्यात आदिवासींनी साजरी केली वसुबारस

सकाळवृत्तसेवा

ठाणे : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले. माजी आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी प्रांगणातील तारपाधारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आदिवासी संस्कृतीची ओळख सांगणारे तारपा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या चौकात देखील कार्यक्रम पार पडला.

ठाणे आणि पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर,म-ठाकूर आदिवासी जमातीचे बांधव राहतात. आदिवासी जिल्ह्यातील ओळख व आदिवासी संस्कृतीचे प्रतिक म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपाधारी अर्ध पुतळा उभारण्यात आलेला आहे. याप्रसंगी आदिवासी वारली समाज सेवा मंडळ अध्यक्ष दत्तात्रय भुयाळ, हंसराज खेवरा, दत्ता भुयार, भाऊसाहेब गंभीरे, गणेश वाघे, सुनील तुकाराम भांगरे यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT