मॅनहोलवर नव्याने लावण्यात आलेले झाकण. ते चोरी होऊ नये म्हणून त्यावर ठेवलेली कुंडी.
मॅनहोलवर नव्याने लावण्यात आलेले झाकण. ते चोरी होऊ नये म्हणून त्यावर ठेवलेली कुंडी. 
मुंबई

रिक्षातून आले आणि मॅनहोलचे झाकण चोरून गेले...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जुहू-वर्सोवा मार्गावरील मॅनहोलचे झाकण चोरीला गेले असून महापालिकेने अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिक्षातून आलेल्या काही व्यक्तींनी झाकण चोरले असल्याची शक्‍यता असून तसे महापालिकेने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. आजपर्यंत मुंबईत अनेक मॅनहोलची झाकणे चोरीला गेली आहेत. गर्दुल्ले वा भुरटे चोर झाकणे चोरून भंगारात विकत असतात. पण प्रथमच एका रिक्षातून येऊन नियोजनपद्धतीने झाकणाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तक्रारीत रिक्षाचा क्रमांक देण्यात आल्याने चोर सापडण्याची शक्‍यता आहे.

जुहू-वर्सोवा जोडरस्त्यावरील विनीत टॉवरसमोरील दुभाजका-जवळील मॅनहोलचे झाकण शनिवारी मध्यरात्री चोरीला गेले. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने सारा प्रकार बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रहिवाशांना त्याबाबत माहिती दिली. रहिवाशांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात त्याची कल्पना दिली. त्यानंतर प्रभागातील दुय्यम अभियंता रमेश गिरगावकर आणि सचिन माने यांनी प्रत्यक्ष येऊन खात्री केली. सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एमएच ४७ डी ०७९५’ क्रमाकांच्या रिक्षातून तिघे जण आले होते. त्यांनी झाकण चोरले, अशी तक्रार पालिकेने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मॅनहोलचे लोखंडी झाकण सुमारे २० हजाराचे  होते, अशी माहिती पालिकेने तक्रारीत नमूद केली आहे.

का होते झाकणांची चोरी?
मुंबईत पालिकेचे सुमारे ५६ हजार मॅनहोल आहेत. पूर्वी सर्व मॅनहोलना लोखंडी झाकणे होती. गर्दुल्ले आणि भुरटे चोर झाकणे चोरून भंगारात विकत असल्याने किमान दहा वर्षांपूर्वी महापालिकेने भंगारात किंमत नसलेली विशिष्ट फायबरची झाकणे बसवण्यास सुरुवात केली. मात्र तीही चोरीला जाऊ लागली. महापालिकेने आतापर्यंत अनेक वेळा पोलिसात तक्रार दाखल केली होती; मात्र कोणतेही पुरावे नसल्याने चोरांना पकडणे शक्‍य नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT