मुंबई

विदेशी बाटलीत गोव्याची दारु; पकड गये ना मामू!

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : गोवा बनावटीचे मद्य स्वस्तात आणून महागड्या विदेशी बाटलीत भरून विकणाऱ्या तीन मद्य तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या भरारी पथकाने अटक केली. या कारवाईत कारसह सहा लाख 35 हजार किमतीच्या महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या 155 मद्याच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. त्याचबरोबर, बनावट मद्य बाटल्या निर्मितीसाठी लागणाऱ्या ब्रॅंडेड रिकाम्या बाटल्या, लेबल्स, कोरी बुचे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

ही बातमी वाचा ः  काॅंग्रेसला मिळणार हि खाती; खातेवाटपाची यादी सकाळच्या हाती
गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात चारपट किमतीत विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी भरारी पथकाचे निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड आदींच्या पथकाने ठाणे परिसरात येत असताना वसई येथील सातिवली पुलाच्या खाली सापळा रचला. तसेच, मद्य भरलेल्या एका चार चाकी वाहनासह रामकिशोर निषाद, मुखलाल निर्मल आणि भवानीदिन निषाद या तिघांना ताब्यात घेतले.

वाहनामध्ये 750 मिलीच्या 155 सीलबंद गोवा बनावटीच्या बाटल्या आणि रिकाम्या बाटल्या, कोरी बुचे व लेबल्स असा तब्बल सहा लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. गोव्यात अवघ्या 160 रुपयांत मिळणाऱ्या मद्याच्या बाटलीतील मद्य बनावट बाटलीमध्ये भरून महाराष्ट्रात तब्बल 750 रुपयांत विक्री केली जात असे. या तस्करीसाठी लागणाऱ्या रिकाम्या बाटल्या व बुचे, लेबल्सचा साठा या टोळीकडून हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती दुय्यम निरीक्षक राठोड यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT