esakal | काँग्रेसला मिळणार 'ही' खाती, खातेवाटपाची यादी सकाळच्या हाती..
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसला मिळणार 'ही' खाती, खातेवाटपाची यादी सकाळच्या हाती..

काँग्रेसला मिळणार 'ही' खाती, खातेवाटपाची यादी सकाळच्या हाती..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्था

मुंबई : खातेवाटपाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. गेले अनेक दिवस रखडलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा खातेवाटपाला आज मुहूर्त लागणार अशी माहिती समोर येतेय. त्याआधी काँग्रेसची दहा कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी आपल्यासमोर आलीये. काँग्रेस अधिक खाती आपल्याकडे यावीत यासाठी आग्रही होती. यामध्ये काँग्रेस सांस्कृतिक, पर्यटन आणि बंदरे ही खाती स्वतःकडे वाढवून घेण्यास यशस्वी ठरल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपद आलंय. 

मोठी बातमी : कर्ज फेडलं नाही तर 'ते' घरी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारासोबत...

काँग्रेसमध्ये महसूल खात्यावरून वाद झाला होता असं बोललं जात होतं. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे दोघे नेते महसूल खात्यासाठी उत्सुक होते. मात्र आता महसूल खातं बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेल्याचं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय.  तर अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं जाताना पाहायला मिळतंय 

PHOTO : पद्मा लक्ष्मीने पुन्हा शेअर केले टॉपलेस फोटो, इंटरनेटवर लावली आग..

काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप सकाळच्या हाती  लागलीये. बाळासाहेब थोरातांना महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय. नितीन राऊतांकडे ऊर्जा, विजय वड्डेटीवार यांच्याकडे ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन, के.सी.पाडवींकडे आदिवासी विकास, यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला आणि बालकल्याण, अमित देशमुखांकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खातं, सुनील केदार यांच्याकडे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन, वर्षा गायकवाडांकडे शालेय शिक्षण, तर अस्लम शेख यांच्याकडे वस्त्रोद्योग,मत्स्य व्यवसाय आणि बंदरं ही खाती दिली जाणार आहेत. याशिवाय, सतेज पाटील यांना गृह राज्यमंत्री (शहर), तर विश्वजित कदम यांना कृषी आणि सहकार राज्यमंत्रीपद देण्यात आल्याची माहिती आहे.

धक्कादायक : चल वडापाव देतो, चायनिज देतो सांगून तिला घेऊन जायचे आणि..

आता थोड्याच वेळात शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी देखील समोर येताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळात खातेवाटपाची अधिकृत घोषणा देखील होणार आहे अशी माहिती समोर येतेय. 

list of roles and duties assigned to the ministers of congress in maharashtra cabinet