मुंबई

व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १०२ रुपयांनी घटवल्याने दिलासा

CD
व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमती घटल्या नवी दिल्ली, ता. २ (वृत्तसंस्था) ः नवीन वर्षात देशातील सरकारी तेल उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १०२.५० रुपयांनी घटविल्याने वाढत्या महागाईत व्यावसायिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. हे व्यावसायिक गॅस सिलिंडर मुख्यतः हॉटेल, छोटे-मोठे स्टॉलधारक, खाद्यपदार्थ तयार करणारे व्यावसायिक व कंपन्या आदींकडून वापरले जातात. वारंवार या सिलिंडरची दरवाढ होत असल्याने त्यांनाही अन्नपदार्थांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसला असता. मात्र या दरकपातीमुळे आता साऱ्यांनाच दिलासा मिळेल. मात्र, नव्या वर्षात १४ व १० किलोंच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत फरक पडला नाही. हे व्यावसायिक गॅस सिलिंडर १९ किलो वजनाचे (गॅसचे वजन) असते. आता या दरकपातीमुळे नव्या वर्षात त्याची किंमत १,९९८.५० रुपये होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला या किमतींचा आढावा घेतला जातो. महिन्यापूर्वी म्हणजे एक डिसेंबर रोजी ही किंमत शंभर रुपयांनी वाढविण्यात आली होती. त्यामुळे नवी दिल्लीत हा सिलिंडर २,१०१ रुपयांना मिळत होता. यापूर्वी २०१२-१३ मध्ये त्याची किंमत २,२०० रुपयांवर पोहोचली होती. तर मागील वर्षी एक नोव्हेंबर रोजीही व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत २६६ रुपयांची वाढ झाल्याने त्याची किंमत २,०००.५० रुपयांवर गेली होती. त्यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी या सिलिंडरची किंमत ४३ रुपयांनी, तर सप्टेंबरमध्ये ७५ रुपयांनी वाढविण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT