मुंबई

उपाशीपोटी असणाऱ्यांना भोजन; अंबरनाथमधील सोसायटीचा उपक्रम

CD
गरजूंना मिळतेय मोफत भोजन अंबरनाथमधील सोसायट्यांमध्ये अनोखा उपक्रम श्रीकांत खाडे ः सकाळ वृत्तसेवा अंबरनाथ, ता. ९ ः पदपथावर मुक्काम करणाऱ्या कित्येकांवर रात्री उपाशी पोटी झोपण्याची वेळ येते; पण अंबरनाथमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने सुरू केलेल्या ‘अन्नदान महादान’ या उपक्रमातून अशा बेघरांना रोज रात्री ताजे भोजन मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या गृहनिर्माण संकुलात नागरिकांसाठी योजनेबाबत जनजागृती करण्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. शहरातील पदपथ, उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी नागरिक रात्रीच्या वेळी आसरा घेतात. या नागरिकांना रात्रीचे अन्न मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अंबरनाथचे रहिवासी आणि पवई येथे एका कंपनीत नोकरी करणारे मोनी पैनीकर यांनी या गरजू नागरिकांसाठी ३१ डिसेंबरपासून ‘अन्नदान महादान’ योजना सुरू केली आहे. मोठ्या गृहनिर्माण संकुलात नागरिकांसाठी योजनेबाबत जनजागृती करण्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये बेघर नागरिकांना देण्यासाठीचे ताजे जेवण रात्री १० वाजेपर्यंत व्यवस्थित बांधून योग्य ठिकाणी ठेवावे, शिळे जेवण असू नये, चांगले जेवण दान करा, प्रत्येकाच्या घरी एका अतिरिक्त माणसाचे जेवण असू शकते, यातूनच एखाद्या भुकेलेल्याचे पोट भरू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे. पैनीकर यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून इतर सोसायटीमधील नागरिकही मदतीसाठी पुढे येत आहेत. कोट... जमा झालेले अन्नपदार्थ रोज रात्री १०.३० वाजता घेऊन जातो. ते पदपथ, उड्डाणपूल, रेल्वेस्थानक या ठिकाणी जाऊन एकटा वाटप करीत होतो. आता काही नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होत आहेत. कोणी उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतो. - मोनी पैनीकर, अंबरनाथ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT