मुंबई

दगडखाणी विरोधात खडकोलीच्या ग्रामस्थांचा एल्गार

CD
दगड खाणीविरोधात खडकोली ग्रामस्थ आक्रमक मनोर, ता. १२ (बातमीदार) ः दगड खाणीत केल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या सुरुंग स्फोटांमुळे खडकोली गावच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खाणीसाठी दिलेला ना हरकत दाखला बेकायदेशीर आहे, असे सांगत ग्रामस्थांनी हा दाखला ग्रामसभेत रद्द करून खाण बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मात्र, तक्रारीनंतरही महसूल विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांकडून सोमवारी दगड खाणीविरोधात आंदोलन केले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खाणीचा रस्ता रोखला होता. उच्च क्षमतेच्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दगड खाण तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी करण्यात आली आहे. सफाळे पोलिस ठाण्याचे प्रभारी संदीप कहाळे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. जी आर इन्फ्रा कंपनीला खडकोली गावातील आदिवासी खातेदाराच्या गट क्रमांक १८७, १८५, १७७ अ आणि १७७ ब शेतजमिनीतून दगड उत्खननाला २६ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरम अभावी रद्द झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसेडिंगमध्ये फेरफार करून ग्रामस्थांची दुबार नावे आणि खोट्या सह्यांच्या आधारे कोरम पूर्ण झाल्याचे भासवून दगड उत्खननाला परवानगी असणारा ठराव संमत करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खाणीत होत असलेल्या उच्च क्षमतेच्या सुरुंग स्फोटामुळे खडकोली गाव आणि सूर्या नदीच्या पूर्वेकडील खामलोली गावापर्यंत हादरे बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दगड उत्खनन होत असलेल्या खाणी लगतच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी जी आर इन्फ्रा कंपनीच्या एच आर व्यवस्थापक सिद्धार्थ निगम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व परवानग्या घेऊन खाण सुरू केल्याचे सांगितले आहे. ना हरकत दाखला रद्द खडकोलीच्या ग्रामस्थांकडून दगड खाण बंद करण्याची मागणी केली होती. ३ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत जी आर इन्फ्रा कंपनीला बेकायदेशीर रित्या दिलेला ना हरकत दाखला रद्द करीत दगड खाणीतून दगड उत्खनन बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT