मुंबई

जिल्ह्यात पाणी शुद्धतेची तपासणी करण्याच्या महिला प्रशिक्षणाची सुरवात

CD
पाणी शुद्धतेची तपासणी महिला करणार जलजीवन मिशनतर्फे प्रशिक्षणाला सुरुवात पालघर, ता. १२ (बातमीदार) ः जिल्ह्यातील प्रत्येक महसूल गावात शाश्वत शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आता पाणी शुद्धतेची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ८८६ महसूल गावांत प्रत्येकी पाच महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ हजार ७२७ पाणी स्रोतांची तपासणी होणार आहे. जलजीवन मिशन या योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शरीरात शुद्ध पाणी गेले तरच आरोग्य चांगले राहते. पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एक किट खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये २० मिली लहान काचेची बाटली आहे. या बाटलीमध्ये स्रोताचे पाणी भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवावे लागणार आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे हे स्पष्ट होणार आहे. प्रत्येक गावातील ५ महिलांचे प्रशिक्षण या महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांची तपासणी होणार आहे. तपासणी झाल्यानंतर त्याच्या अहवालाची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमधील डेटा एन्ट्री ऑपरेटर घेणार आहेत. पाण्याची तपासणी करण्यासाठी नमुना घेताना महिला प्रत्यक्ष पाण्याच्या स्रोताजवळ जाणार आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्रोतांची स्वच्छताही करून घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT