मुंबई

‘एच३ एन२’चे राज्यात पाच मृत्यू

CD

मुंबई, ता. २८ : संशयित मृत्यू म्हणून नोंद असलेल्या मृतदेहाच्या मृत्यू परीक्षणाच्या अहवालानंतर मंगळवारी राज्यातील ‘एच३ एन२’च्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे, तर वाशीम येथे एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यामध्ये १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘एच३ एन२’च्या रुग्णांची संख्या ३३३ इतकी झाली आहे.
राज्यात दिवसेंदिवस ‘एच३एन२’ आणि ‘एच१एन१’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात ‘एच३ एन२’चे संशयित मृत्यू म्हणून नोंद झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल मंगळवारी आल्याने राज्यातील ‘एच३ एन२’ मृतांची संख्या पाचवर पोहोचली. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे ३ लाख ४८ हजार २१४ संशयित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ‘एच१एन१’चे ४३९; तर ‘एच३एन२’चे ३३३ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
...
यंत्रणा सज्ज
इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तिथे आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा ठेवण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT