मुंबई

पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांना सेवा बंधनकारक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयानुसार एमडी, एमएस असे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या देशातील सर्व निवासी डॉक्टरांना तीन महिने जिल्हा रुग्णालयात काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयांमधील निवास व्यवस्था आणि इतर अडचणी लक्षात घेऊन मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांना आता महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन महिने सेवा द्यावी लागणार आहे.
२०२१ नंतरच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात तीन महिने काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जे निवासी डॉक्टर त्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सेमिस्टरमध्ये आहेत, त्यांना रोटेशनल आधारावर ही सेवा प्रदान करावी लागेल. जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या हद्दीतील सर्व निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची जबाबदारी जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडे आहे. याअंतर्गत जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत या वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांची विविध रुग्णालयांमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जे.जे., के.ई.एम., नायर, कूपर, सायन रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना पुढील आठवड्यापासून उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन महिने सेवा द्यावी लागणार आहे.
.......
आयोगाचा हा कार्यक्रम सर्व निवासी डॉक्टरांसाठी अनिवार्य आहे. त्याची योग्य अंमलबजावणी कशी होत आहे, याकडेही लक्ष दिले गेले आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांची उपनगरीय रुग्णालयांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय

उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील ४० ते ५० निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये गरजेनुसार या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, महापालिका उपनगरीय रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT