मुंबई

धारावीत कोविड रुग्णसंख्येत प्रचंड घट

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कोविडच्या दोन वर्षांच्या काळात धारावीत सर्वाधिक रुग्ण आढळले होते. सध्या मात्र धारावीतील कोविड रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट सुरू असल्याचे पालिका वॉर्ड प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१५ दिवसांत धारावीत एकाही कोविड रुग्णाची नोंद न झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोविड आरोग्य आणीबाणी मागे घेतली असून जगभरातील रुग्णसंख्या घटत असल्याचे कारण डब्ल्यूएचओने दिले होते. राज्यासह मुंबईतही कोविड रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे.
मुंबईतील तीन वॉर्डांत गेल्या आठवड्यात एकाही प्रकरणाची नोंद झाली नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड आरोग्य आणीबाणी मागे घेतल्यापासून चाचणी आणि लसीकरणाची मागणी केली जात नाही. त्यासाठी नागरिक क्वचितच कोविड केंद्रांवर येत असल्याचे मत पालिका आरोग्य अधिकारी व खासगी डॉक्टरांनी मांडले. कोविडच्या सुरुवातीपासून धारावीमध्ये एकूण ९,३३० रुग्ण नोंदविण्यात आले. त्याच वेळी दहिसर म्हणजेच आर उत्तर वॉर्ड, सॅण्डहर्स्ट रोड बी वॉर्ड आणि मरीन लाईन्स सी वॉर्डांमध्ये ९ ते १५ मेदरम्यान एकाही कोविड रुग्णाची नोंद झाली नाही. के पश्चिम वॉर्डात २९, एच पश्चिम वॉर्डात २६ आणि डी वॉर्डसारख्या विभागात रुग्ण सतत नोंदविले जात होते.

नाकाद्वारे लसीलाही कमी प्रतिसाद
मुंबईला नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या लशीचे दोन हजार डोस मिळाले असले, तरी आतापर्यंत फक्त ८९ जणांनी ती घेतली असल्याचे आकडेवारी सांगते. कोविड विषाणूमध्ये क्षमता नसल्याचे सांगत तो सामान्य फ्लूसारखा झाला आहे. त्यामुळे रुग्णही चाचणी करण्यास नकार देत आहेत. प्रतिजैविकांची गरज नसताना रुग्ण तीन दिवसांत बरे होत आहेत, असे बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT