मुंबई

मुलुंडच्या ‘कॅपिटल गेन’च्या मालकावर मुलुंडमध्ये गुन्हा

CD

मुलुंडच्या ‘कॅपिटल गेन’च्या
मालकावर मुलुंडमध्ये गुन्हा

गुंतवणूकदारांची ३.१६ कोटींची फसवणूक

मुंबई, ता. २८ : अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची तीन कोटी १६ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या मुलुंड येथील कॅपिटल गेन या कंपनीचा मालक जितेंद्र यादवविरोधात गुरुवारी गुन्हा नोंदवला आहे.
तीन वर्षांपूर्वी यादवविरोधात दिलेली तक्रार मुलुंड पोलिस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्याने तात्पुरती निकाली काढली होती. त्यानंतर आरोपी यादव मुलुंडमधील कार्यालय बंद करून पसार झाला, असा दावा तक्रारदाराने केला आहे. अंबरनाथ येथे राहणाऱ्या वैभव कर्ले या तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी यादवचा शोध सुरू केला आहे. वैभव, त्याचे वडील आणि भावाने यादवकडे नऊ लाख ५० हजार रुपये गुंतवले होते. वडिलांच्या परिचित व्यक्तीने ओळख करून दिल्याचे वैभव याने आपल्या जबाबात सांगितले आहे. २०२०मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यानंतर यादवने वर्षभर व्याज दिले. त्यानंतर ते बंद केले. त्यानंतर यादवने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्याविरोधात २०२२ मध्ये मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक जितेंद्र झोमान यांनी हा अर्ज निकाली काढला. त्यानंतर आरोपी यादव पळून गेला, असे वैभवने जबाबात म्हटले आहे.
--------
२१ जणांची गुंतवणूक उघड
जितेंद्र यादव याच्या योजनेत गुंतवणूक केलेल्या अन्य २१ व्यक्तींची माहिती मिळाली आहे. या सर्वांनी या फसव्‍या योजनेत एकत्रित तीन कोटी ९० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यातील ८४ लाख रुपयांचा परतावा त्यांना मिळाला आहे, अशी माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! गृहनिर्माण सोसायटीतील मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क; उच्च न्यायालयाचा बिल्डरला दणका; सभासदांना ‘या’ कार्यालयाकडे करावा लागेल अर्ज, वाचा...

आजचे राशिभविष्य - 01 मे 2026

Panchang 1 May 2026 : आजचे पंचांग! बुद्ध पौर्णिमा, शुभ मुहूर्त अन् राहु काळ जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2026

थंड थंडाई

SCROLL FOR NEXT