मध्य रेल्वेचा तिकीट दलालांवर कारवाईचा बडगा
पाच महिन्यांत आठ ठिकाणी छापे, लाखोंची तिकिटे जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वे दक्षता पथकाने तिकिटांचे हस्तांतरण, दलाल, बनावट ओळखपत्रे आणि बनावट तिकिटांवर प्रवास यासारख्या बेकायदा तिकिटे खरेदी करण्याच्या पद्धतींवर सतत लक्ष ठेवले आहे. जानेवारी ते मे २०२५ पर्यंत मध्य रेल्वे वाहतूक दक्षता पथकाने अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी आठ प्रतिबंधात्मक तपासणी केल्या. या तपासणीमध्ये १९७ तिकिटे जप्त केली.
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारातून होणारी प्रचंड कमाई लक्षात घेता देशभरात हजारो लहान-मोठ्या टोळ्या तिकीट बुकिंगच्या गोरखधंद्यात गुंतल्या आहेत. प्रत्येक टोळीचे मार्ग वेगळे असतात. अगदी तिकीट विंडोवर जाऊन बुकिंगवर हात मारणाऱ्या दलालांपासून एकापेक्षा एक सॉफ्टवेअर वापरत एकगठ्ठा तिकिटे मिळविणारेही आहेत. उन्हाळी सुट्टी, दिवाळी, छट पूजा या हंगामात गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. या वेळी तिकीट दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या तिकीट दलालांवर रेल्वेतर्फे वारंवार कारवाई करण्यात येते.
रेल्वेच्या कारवाईचा तपशील
*फेब्रुवारी
अंबरनाथ येथे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बेकायदा ई-तिकीट विक्री उघडकीस. १२ हजार रुपये किमतीची आठ तिकिटे, १३ आयआरसीटीसी आयडी जप्त
कोल्हापूरमध्ये चार तिकीट दलालांना २५ हजार रुपये किमतीच्या चार तिकिटांसह अटक.
*मार्च
पुण्यात डेक्कन जिमखाना येथे तीन तिकीट दलालांना १० हजार ५२० रुपये किमतीच्या तीन तिकिटांसह पकडले.
सिस्टीमचा गैरवापर करीत रिझर्व्हेशन क्लर्कने वैयक्तिक फायद्यासाठी तिकीट प्रिंट न करता सिस्टीममध्ये जारी केले.
*एप्रिल
ट्रेन क्र. ११०५५ मध्ये दोन प्रवाशांना खोट्या ओळखपत्र आणि हस्तांतरित तिकिटांसह प्रवास करताना पकडले.
*मे
रेल्वे कर्मचारी नसलेले दोघे जण प्रिव्हिलेज पासचा वापर करून बुक केलेल्या प्रवासी आरक्षण केंद्रातील तिकिटांसह ट्रेन क्र. १२७४१ मध्ये पकडले.
मलकापूरला दोन व्यक्तींना १० लाख किमतीच्या १८२ तिकिटांसह अटक
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.