वाढत्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ
महापौरांची कबुली, प्रशासन हतबल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केल्याने खळबळ मजली आहे. याबाबत महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईत २,२५० ठिकाणी इमारत बांधकामे, मेट्रो रेल्वे तसेच इतर प्राधिकरणांची कामे सुरू असल्याने हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे महापौरांनी मान्य केले.
महापौर तावडे पुढे म्हणाल्या, की महापालिका प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून, प्रसंगी संबंधितांना नोटिसादेखील बजावत असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईला विविध मार्गांनी विकासकामे हवी आहेत. मुंबईत सध्या २,२५० ठिकाणी इमारत बांधकामे सुरू आहेत. एमएमआरडीए, मेट्रोची कामे सुरू आहेत. महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत; तरीही मुंबईची हवा काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची कबुली महापौर रितू तावडे यांनी दिली.
मुंबईमध्ये १२ मार्चला काही ठिकाणी धुक्याचा जाड थर तयार झाल्याचे निदर्शनास आल्याने अभिनेत्री दीपिका पदुकोणने नाराजी व्यक्त करीत थेट सामाजमाध्यमावरून महापालिका प्रशासनाला जाब विचारला. मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. या परिस्थितीचा फोटो शेअर करीत अभिनेत्री दीपिका पदुकोणने संताप व्यक्त केला आहे.
महापौर तावडे यांनी मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी नियमावली जाहीर केली असल्याचे सांगितले. बांधकामांच्या ठिकाणी किती एअर क्वालिटी आहे याची माहिती घेण्यासाठी डिजिटल बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. डिजिटल बोर्ड कार्यान्वित केल्याने त्या ठिकाणच्या एअर क्वालिटीची माहिती मिळते. मात्र ज्या बांधकामांच्या ठिकाणी नियमावलीचे उल्लंघन होते त्यांना नोटिसा बजावण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.