बोरिवलीत इमारतीला आग
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील एमएचबी कॉलनी परिसरात असलेल्या प्रथमेश टॉवर या इमारतीला शनिवारी (ता. १४) सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०:४६च्या सुमारास बोरिवली (पश्चिम) येथील प्रथमेश टॉवर या तळमजला अधिक आठमजली इमारतीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.