मुंबई

सायबर भामट्यांना सीम कार्ड पुरवणारा अटकेत

CD

सायबर भामट्यांना सिम कार्ड पुरवणारा अटकेत
१०० सिम कार्ड पुरविल्याचे स्पष्ट
मुंबई, ता. १५ ः आर्थिक फसवणुकीसाठी आवश्यक सिम कार्ड सायबर भामट्यांना पुरवणाऱ्या तरुणास पोलिसांनी नागपाडा परिसरातून अटक केली. मोहम्मद सुलतान अन्सारी असे आरोपीचे नाव असून, त्याने आतापर्यंत १०० सिम कार्ड भामट्यांना पुरविण्याची नेमकी माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे या सिम कार्डआधारे भामट्यांनी देशभर गुन्हे केल्याचे धागेदोरेही हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सारी एअरटेल कंपनीचा एजंट आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टल यांच्या पडताळणीमध्ये सायबर गुन्ह्यांसाठी वापर झालेल्या संशयित मोबाईल क्रमांकांपैकी १०० क्रमांक अन्सारीने सुरू(ॲक्टिव्हेट) केले होते.
संशयित मोबाईल क्रमांकाच्या यादीआधारे सायबर पोलिसांनी (मध्य विभाग) केलेल्या तांत्रिक तपासात अन्सारीचे नाव पुढे आले. त्याला नागपाडा परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान ग्राहकांच्या नावे त्याने दोन सिम कार्ड सुरू केल्याचे स्पष्ट झाले. पहिले सिम कार्ड ग्राहक वापरत असे. मात्र त्या ग्राहकाचे काही खरे, तर काही खोटे तपशील वापरून अन्सारीने सुमारे १०० सिम कार्ड सुरू करून ती जिशान नावाच्या व्यक्तीकरवी सायबर भामट्यांना विकली. त्यासाठी त्याला आतापर्यंत ९० हजार रुपये मिळाले, अशी माहिती पुढे आली.
सायबर पोलिस भामट्याच्या संपर्कात असलेल्या जिशान नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अन्सारीने उपलब्ध करून दिलेल्या सिम कार्डआधारे भामट्यांनी मुंबईसह देशभरात फसवणुकीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रत्येक गुन्ह्याचे तपशील पोलिस त्या त्या राज्यातून मागवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT