मुंबई

पालिकेत निधीचा ''असमान'' पाऊस; सत्ताधाऱ्यांवर कोट्यवधींचा वर्षाव, विरोधकांची लाखांत बोळवण

CD

निधीचा ‘असमान’ पाऊस!
सत्ताधाऱ्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; विरोधकांची लाखांत बोळवण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पीय फेरफारात ८०० कोटी रुपयांच्या निधीवाटपावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधारी महायुतीतील नगरसेवकांवर कोट्यवधींच्या निधीची खैरात करण्यात आली असताना, विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांना मात्र अवघ्या २० ते २५ लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे. या निधीवाटपातील तफावतीमुळे पालिकेत आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
सुमारे २५ वर्षांनंतर पालिकेत सत्तांतर होऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. सत्तांतरानंतर निधीचे समान वाटप होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. प्रत्येक नगरसेवकाला किमान एक कोटी रुपये देण्यात आले असले, तरी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना सव्वा दोन कोटींपर्यंत वाढीव निधी मिळाला आहे. याउलट, विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांच्या पदरी जेमतेम २५ लाख रुपये पडले आहेत. ‘निधीच मिळाला नाही तर प्रभागातील कामे कशी करायची,’ असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
निधीवाटपात पक्षीय गटनेत्यांवर विशेष मेहेरबानी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सर्वाधिक २० कोटी रुपये आपल्या प्रभागासाठी पदरात पाडून घेतले आहेत. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले आणि उपमहापौर संजय घाडी यांना प्रत्येकी १० कोटी मिळाले आहेत. आश्चर्य म्हणजे, गटनेत्यांना मोठी रसद पुरवून त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

​प्रमुख नगरसेवकांना मिळालेला निधी :
​गणेश खणकर (भाजप) : २० कोटी

​अमेय घोले (शिवसेना) : १० कोटी

​राजेश्री शिरवडकर (भाजप) : १० कोटी

​डॉ. सईदा खान (राष्ट्रवादी) : ३ कोटी

​प्रभाकर शिंदे (स्थायी समिती अध्यक्ष) : २.५ कोटी

​रितू तावडे (महापौर) : २.२५ कोटी

​आश्रफ आजमी (काँग्रेस) : २ कोटी

​किशोरी पेडणेकर (शिवसेना ठाकरे) : २ कोटी

.......
विषम वाटपामुळे असंतोष
एकीकडे गटनेत्यांना कोट्यवधी रुपये मिळत असताना, शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाखा राऊत आणि काँग्रेसच्या आशा काळे यांच्यासारख्या आक्रमक नगरसेविकांना अवघ्या २५ लाख रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) अजित रावराणे यांना २.२५ कोटी मिळाले असले तरी, एकूणच विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये या विषम वाटपामुळे प्रचंड असंतोष असून, आगामी महासभेत याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT