मुंबई

पालिकेचे ई-टॉयलेट अस्वच्छतेचे आगार

CD

वाशी, ता. १२ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावर मोठा गवगवा करत नवी मुंबई महापालिकेने ई-टॉयलेटची संकल्पना राबवली आहे. मात्र, या मार्गावरील ई-टॉयलेट परिसरात रात्रीच्या वेळी तृतीयपंथीयांचा वावर वाढल्याने वाहनचालकांना जाणे भीतीदायक वाटत आहे. त्यामुळे वापराविना पडून असलेले ई-टॉयलेट आता अस्वच्छतेचे आगार बनले आहे.
‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने पाच वर्षांपूर्वी ठाणे-बेलापूर मार्गावर महापे येथील ई-टॉयलटचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन केले होते. त्यांनतर याच मार्गावर ९ ठिकाणी लाखो रुपये खर्च करून ई-टॉयलेट उभारले आहेत. यात पावणे उड्डाणपूल, महापे स्कायवॉकजवळ, एमआयडीसी कार्यालयानजीक, रिलायन्स कंपनीजवळ, तळवली नाका, रबाळे पोलिस ठाणे, सिमेन्स कंपनी व उरण जंक्शनचा समावेश आहे. या अभिनव संकल्पनेमुळे महामार्गावरील प्रवाशांना काहीअंशी दिलासादेखील मिळाला होता. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे बहुतांश ई-टॅायलेटमध्ये असलेला पाण्याचा अभाव आणि बंद अवस्थेत असलेल्या विद्युत रोषणाईमुळे त्यांचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या या संकल्पनेलाच उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.
--------------------------
ई-टॉयलेटच्या बाजूला तृतीयपंथींचा वावर असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. लवकरच त्याची पाहणी करण्यात येईल. तसेच त्यासंदर्भात पोलिसांना पत्र देण्यात येईल.
- बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT