मुंबई

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस बंद करा!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्यात आल्या; मात्र या एक्स्प्रेसला कल्याण-कसारा-कर्जत स्थानकांवर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना त्या निरुपयोगी ठरत आहे. शिवाय या एक्स्प्रेसमुळे लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे स्थानिकांचा कोणताही विचार न करता सुरू केलेली वंदे भारत एक्स्प्रेस कायमची बंद करावी, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.

मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल वाहतूक कुर्ला ते कल्याणपर्यंत पाच-सहा मार्गिका असल्याने सुरळीत धावते; परंतु पुढे कसारा आणि कर्जत मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मालगाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. विशेषतः कसारा मार्गावर एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या मार्गावरून दैनंदिन लाखो प्रवासी ये-जा करत असताना अपुऱ्या लोकल संख्येचा येथील प्रवाशांना मोठा फटका बसतो. लोकल वाढीची मागणी केल्यास प्रशासनाकडून मालगाड्या-एक्स्प्रेस, शिवाय तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे कारण दिले जाते; परंतु त्याचवेळी मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मात्र सर्रास सुरू केली जाते.

कसारा मार्गावरील अप-डाऊन लोकलचे वेळापत्रक दररोज एक्स्प्रेस-मालगाड्यांमुळे विस्कळित होत असताना वंदे भारत एक्स्प्रेसचाही फटका लोकल प्रवाशांना बसत आहे. त्यात या एक्स्प्रेसला कल्याण-कसारा थांबा नसल्याने प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस सोयीची नसल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांचा विचार न करता सुरू केलेली वंदे भारत एक्स्प्रेस कायम बंद करावी; अन्यथा कल्याण-कसारा-कर्जत स्थानकांत थांबा द्यावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनने केली आहे.

कसारा मार्गावर वारंवार लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी होते; परंतु प्रशासन विविध कारणे देऊन ही मागणी फेटाळून लावते. स्थानिकांचा विचार न करता वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण आणि कसाऱ्याला थांबा दिला नाही. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना ती सोयीची नाही. उलट या एक्स्प्रेसमुळे लोकल वाहतूक विस्कळित होते. त्यामुळे ही एक्स्प्रेस बंद करावी.
- उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT