मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये विद्यार्थी रंगले रंगात

CD

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत मिरा-भाईंदर महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाशी निगडित विषयांवर शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
पर्यावरण संरक्षण, वसुंधरा संवर्धन, ऊर्जाबचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर, प्लास्टिक मुक्त मिरा भाईंदर शहर, वृक्ष संवर्धन आदी विषय चित्रकला स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मिरा भाईंदरमधील ७५ शाळांतील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रकला पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगून पर्यावरण संवर्धनाची व स्वच्छतेची सवय आतापासूनच अंगी बाळगून आपले भविष्य प्रदूषणमुक्त, हरित व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. यावेळी माझी वसुंधरा व स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, उप-मुख्य उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, नागेश विरकर, शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT