मुंबई

भास्कर जाधवही शिंदे गटात येण्यासाठी इच्छुक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे शहरात येऊन भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, पण ठाकरे गटात काहीच उरले नाही, तुम्ही राणे आणि उदय सामंत यांचे काय ते बघा, शिंदे गटात येतो, असे अनेक वेळा फोन भास्कर जाधव यांनी केल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

भास्कर जाधव सध्या ‘मातोश्री’मध्ये आपण किती विश्वासू आहोत हे दाखवण्यासाठी खटाटोप करत आहेत; पण ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, तेव्हा ठाकरे कुटुंबाला शिव्यांची लाखोली वाहिली, हे सर्वांना माहीत असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. रविवारी (ता. २६) खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील बाईक रॅली आणि गडकरी रंगायतन येथील शिवगर्जना मेळाव्यालाही ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील मेळाव्यात भास्कर जाधव यांनी सर्वांचा खरपूस समाचार घेतला. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या नावाचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि त्यांच्या संवाद यात्रा, परदेशी दौरे करण्यासाठी कुठून पैसा आला, असा थेट सवाल नरेश म्हस्के यांनी केला. तसेच ‘मातोश्री’मधील चंदू-नंदू कोण आणि कोण पैसे मोजतो, यासंदर्भात तोंड उघडायला लावू नका. नाही तर रस्त्यावरून फिरणे मुष्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला. आता आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरे या आडनावाशिवाय दुसरे काहीच नाही. त्याचेच भावनिक भांडवल ते करणार असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT