मुंबई

चोरट्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

CD

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : चोरट्याने घरात शिरून १६ हजारांचे चार मोबाईल घेऊन पोबारा केल्याचा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात नोंद झाला. पोलिस पथकाने सीसी टीव्हीच्या आधारे तीन पथके तयार करून मुंब्रा परिसरातील आरोपी अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी (वय २७) याला अटक केली. नौपाडा पोलिसांनी आरोपीकडून चार लाख ६६ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक करून सहा गुन्ह्यांची उकल केली. अटक आरोपी सखानी याला नौपाडा पोलिसांनी सीसी टीव्हीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीवर नौपाडा पोलिस ठाण्यात चार गुन्हे, कळवा, ठाणेनगर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा असे सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली. आरोपीकडून एक लाख ५० हजारांचे ५ मोबाईल, एक लॅपटॉप, एक मोटारसायकल आणि एक बुलेट असा चार लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT