मुंबई

नातवासोबत मुख्यमंत्र्यांची धुळवड साजरी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह धुळवडीचा आनंद लुटला. नातू रुद्राक्षकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करत राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

निवासस्थानी धुळवड साजरी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमात जाऊन दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावून आशीर्वाद घेतला. आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्या उत्साहात धुळवडीचा सण साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत रंगांची उधळण करत हा सण दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अवकाळी पावसाच्या पंचनाम्याचे आदेश
राज्यात सोमवारपासून (ता. ६) अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार सर्वसामान्य ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT