मुंबई

ठाण्यातील १५६ ठिकाणे कचराकुंड्यामुक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत ठाणे शहरात गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने कचराकुंडीत पडणारा कचरा आता बंद होऊ लागला आहे. त्यामुळे शहरातील १५६ ठिकाणे कचराकुंडीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर उर्वरित ठिकाणेही येत्या एक ते दोन महिन्यांत कचराकुंडीमुक्त करण्यात यश येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे. यासाठी ठाणेकर नागरिकांचीही मोलाची साथ अपेक्षित आहे, असेही बांगर यांनी आवर्जून सांगितले.
राज्याची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत सौंदर्यीकरणाला विशेष महत्त्व दिले. यामध्ये खड्डेमुक्त रस्त्यांबरोबर शहरातील भिंती बोलू लागल्या. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतीत काळजी घेण्यात आली. त्यानुसार ३ डिसेंबरला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात झाली. रस्त्यावर पसरणारा कचरा, कुंड्यांमधील कचरा आणि सार्वजनिक शौचालय यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. याचदरम्यान ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षे कचरा पडत होता. त्या ठिकाणी बॅनरवर नोटीस लावण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडाच्या रकमेचा उल्लेख असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कचरा टाकणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यात आल्याचे नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT