मुंबई

मध्य रेल्वे आरपीएफ श्वान पथक- मध्य रेल्वेचे कॅनाईन हिरो!

CD

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑस्कर, टीपू, डॅनी आणि बॉण्ड!
आरपीएफचे श्वान पथक मध्य रेल्वेचे ‘कॅनाईन हिरो’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आधीच धावणाऱ्या सध्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सणासुदीच्या सुट्ट्यांनिमित्त विशेष एक्स्प्रेस सोडल्या जात आहेत. साहजिकच स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, मालमत्ता आणि सुरक्षेला मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यात रेल्वे पोलिसांच्या बरोबरीने सर्वाधिक मोलाची भूमिका श्वानपथक बजावत आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सुप्रशिक्षित स्निफर श्वानांची एक कार्यक्षम टीम असून त्यात २९ ‘कॅनाईन हिरो’ आहेत. त्यापैकी १८ बॉम्ब आणि स्फोटके शोधण्यासाठी तैनात आहेत. चार श्वान अमली पदार्थ शोधण्यासाठी आणि सात गुन्ह्यांच्या तपासासाठी नेमण्यात आले आहेत.
रेल्वे मालमत्तेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले संरक्षण दल उपाययोजना मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्वान पथक. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील संरक्षण दलामध्ये सध्या प्रशिक्षित स्निफर श्वानांची एक टीम कार्यरत आहे. ‘कॅनाईन हिरो’ म्हणून गणल्या जाणाऱ्या २९ श्वानांचा त्यात समावेश आहे.
पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टिपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बॉण्ड सर्वांत हुशार आणि सक्षम श्वान आहेत. ज्यांनी स्फोटके आणि अमली पदार्थ शोधण्यात रेल्वेला मदत केली आहे, त्यांनी केवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनाच मदत केलेली नाही, तर फौजदारी प्रकरणासारख्या अनेक समस्या सोडवण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
पथकातील श्वानांना माटुंगा, कर्नाक बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याणमध्ये असलेल्या विशेष केनेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. ‘हॅण्डलर’ हेड कॉन्स्टेबल भरत जाधव, मितेश आंबेकर, कॉन्स्टेबल जे. पी. गायकवाड, बजरंग नागरगोजे, रवींद्र झांभे, एस. जी. गायकवाड, सचिन गुप्ता, किशोर पवार, डी. एस. यादव, रामवीर सिंग, तानाजी कांबळे आणि योगेश मीना त्यांना प्रशिक्षण देत आहेत. बहुतांश ‘कॅनाईन’ हीरो लॅब्रेडॉर आणि डॉबरमॅन आहेत. अलीकडे बेल्जियन शेफर्डची काही पिल्ले घेण्यात आली आहेत. २०२२ मध्ये एकूण १४ कुत्र्यांची पिल्ले खरेदी करण्यात आली. त्यापैकी आठ लॅब्रेडॉर आणि एक डॉबरमॅनचे पिल्लू मुंबई विभागाला देण्यात आले आहे. पाच बेल्जियन शेफर्डपैकी तीन पुणे विभागाला आणि प्रत्येकी एक नागपूर व भुसावळ विभागाला देण्यात आले आहेत. कुत्र्याच्या पिल्लांनाही प्रशिक्षिण दिले जाणार आहे. जेणेकरून विद्यमान पथकात असलेले श्वान निवृत्त झाल्यानंतर ते त्यांची जागा घेतील.

रेल्वेबाहेरही क्षमता सिद्ध
मध्य रेल्वेच्या सुपर डॉग्जना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्य सरकारकडूनही मदत मागण्यात आली आहे. तेव्हा त्यांनी रेल्वेबाहेरही आपली क्षमता सिद्ध केली आहे. पथकातील श्वानांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर पदे आणि पदोन्नती दिली जाते. ‘श्वान माणसाचा सर्वांत चांगला मित्र आहे’ असे पथकाचे घोषवाक्य आहे. रेल्वे मालमत्तेला आणि प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्यात ते त्यांचे योगदान सिद्ध करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT