मुंबई

अखेर रेवदंडामध्ये डाकघर कार्यालय सुरू

CD

रेवदंडा, ता. १४ (बातमीदार) : येथील भाड्याच्या जागेत असलेले डाकघर कार्यालय गेले आठ महिने चौलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हलवून नागरिकांना सेवा सुरू केली होती. यात रेवदंडामधील नागरिकांना दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. मात्र ही पायपीट अखेर थांबली असून रेवदंडा गावातील सुतारआळी नव्याने डाकघर कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या जुलै महिन्यात गणपती आळीतील भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या डाकघराची जागा घरमालकांनी सोडण्यास सांगितली होती. त्यानंतर रेवदंडामध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चौलमध्ये डाकघर कार्यालयाचा कारभार चालत होता. मात्र, यात रेवदंडामधील नागरिकांना दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. डाकघरातील बचत ठेव, रजिस्टर, सेवानिवृत्त धारकांना निवृत्ती वेतन आणण्यासाठी वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करणे शक्य नसल्याने रिक्षेचा आधार द्यावा लागत होता. शिवाय व्यवहार होईपर्यंत रिक्षा उभी करून ठेवावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा. मात्र, दोन दिवसांपूर्वीच रेवदंडा गावातील सुतारआळीत डाकघर कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT