मुंबई

भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रयत्न करा

CD

मुंबई, ता. १८ ः देशाच्या विकासासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबरोबरच आपले वैयक्तिक उत्तरदायित्वही असणे जरुरी आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात देशभक्ती बाळगून काम केले, तर भारत नक्कीच विश्वगुरूपदाला पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज (ता. १८) येथे केले.

जी२० परिषदेच्या अंतर्गत सी२० (सिव्हिल) गटातील चौपालची बैठक आज माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये झाली. सामाजिक परिवर्तनासाठी ‘परोपकाराचे महत्त्व’ या विषयावर आयोजित या चौपालमध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर तज्ज्ञ सहभागी झाले होते. सेवा इंटरनॅशनल व सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे हा चौपाल आयोजित केला होता. या वेळी सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक उदय साळुंके आदी मान्यवर हजर होते.

गावाचा विकास न झाल्यास देशाचा विकास होणार नाही. हे असंतुलन संतुलित करण्यासाठी, तसेच गावांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शहरात मिळणाऱ्या सोयी गावात दिल्या पाहिजेत. गावांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नियोजनाची गरज आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये आपण गावांचा विकास होण्यासाठी त्यांना रस्ते, पाणी, घरे, दळणवळणाची साधने दिली का, हे पाहावे. सरकारी योजना गावांमध्ये योग्य प्रकारे पोहोचल्या, तर गावांची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. केंद्राची किंवा राज्याची योजना असे राजकारण विकासात आणू नये, कारण त्या सर्वच योजना गरिबांसाठी आहेत. त्या योजना कार्यकर्त्यांना कळल्या, तरच त्या गावांपर्यंत पोहोचतील, असेही राज्यपालांनी सांगितले.
-----
देशाला विश्वगुरू करूया
भारताला विश्वगुरू करण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या क्षेत्रात देशभक्ती मनात ठेऊन काम करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीला पराजित करणे आजपर्यंत कोणालाही जमले नाही. देशाचा विकास करण्यासंदर्भात या चौपालमध्ये तज्ज्ञांनी विचारविनिमय करून सरकारला सूचना द्याव्यात, असेही राज्यपालांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT