मुंबई

अशोक चुरी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

CD

मुंबई, ता. २१ ः दिवंगत अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघ यांच्या वतीने राज्य शिक्षक पुरस्काराची मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे. हे पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी शाळांचा पाया हा प्राथमिक शाळा आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेतली जावी, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्यातील इयत्ता १ली ते ५वी च्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका यांच्याकडून या वर्षी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. पुरस्काराचे स्वरूप ७,७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे. अशोक चुरी यांच्या पत्नी अनिता चुरी यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती मराठी शाळा संस्थाचालक संघाचे व या पुरस्कार समितीचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी दिली. ३१ मार्चपर्यंत आलेल्या प्रस्तावांचाच विचार करण्यात येईल. पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील व १ मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT