मुंबई

मुरबेत महिला सक्षमीकरण मेळावा

CD

मनोर, ता. २२ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुरबे ग्रामपंचायत कार्यालयात महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, जिल्हा परिषद सदस्या करिश्मा उमतोल, सरपंच मोनालीसा तरे, के. जी. मित्तल महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्रियांका यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात पाककला स्पर्धा, लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, संगीत आदी उपक्रम राबवण्यात आले.
गावातील सर्व समाज घटकातील महिलांमध्ये दुजाभाव न करता समान विकासाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने निश्चित केल्याची माहिती सरपंच मोनालिसा यांनी दिली. या वेळी सामाजसेवेचे काम करणाऱ्या प्रज्ञा तरे आणि मुक्ता देव यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मुरबे गावातील महिला आणि युवती, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस आणि आशा सेविकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. एनसीसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मुंबईच्या के. जी. मित्तल आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी मुरबे ग्रामपंचायत हद्दीत सहादिवसीय निवासी शिबिरासाठी आले होते. या वेळी विविध उपक्रम राबवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT