मुंबई

पनवेल परिसरात तीन अपघात

CD

नवीन पनवेल (वार्ताहर) : परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत टेम्पोमधील प्रवासी विजय पवार (रा. खांदा पनवेल) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे; तर दुसऱ्या घटनेत पनवेल तालुक्यातील बोनशेत येथे गाडी मागे घेत असताना ती कलंडून अपघात झाला; तर तिसऱ्या घटनेत पनवेलजवळील लोहोपेवरून पनवेलकडे प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस ठोंबरेवाडीजवळ कलंडल्याने अपघात झाला. या बसमध्ये साधारण ५० हून अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT