मुंबई

चाकूहल्ला करणारा आरोपी एकलकोंडा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शहरातील ग्रँड रोड येथे चाकूहल्ला करून चौघांचे प्राण घेणारा आरोपी नीलेश गाला याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. तो एकलकोंडा होता आणि सोसायटीत कोणाशीही संपर्क ठेवत नव्हता, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुपारची वेळ होती. त्या वेळी इमारतीत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ही घटना घडली त्या वेळी रहिवाशांना घरफोडी किंवा लूट झाल्याचा संशय आला. आरोपी गुन्हा करून आपल्या घरात जाऊन लपला. त्यामुळे बराच वेळ नेमके काय झाले हे समजले नाही; परंतु जखमी व्यक्तींनी जेव्हा आरोपीबद्दल सांगितले, तेव्हा इतर रहिवाशांना माहिती मिळाली. तो एकलकोंडा असून त्याचा इमारतीतील इतर रहिवाशांशी संपर्क नसायचा. त्याचे फारसे कोणाशी पटत नसल्याचेही येथील रहिवासी सांगतात. थोडक्यात, तो आपल्याच जगात असायचा. त्याच्या या वर्तनामुळे तो मानसिक तणावात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
...
वाचवणाऱ्यांचे गेले प्राण
या प्रकरणात पीडित चारपैकी दोन मृत व्यक्तींचे घर एकाच माळ्यावर आरोपीच्या घराच्या बाजूला आहे. दोघांशी गाला यांचा वाद होता. यांच्यामुळे आपले कुटुंबीय आपल्याला सोडून गेल्याचा त्याच्या मनात राग होता. नीलेशने प्रथम आपल्या घराच्या बाजूला राहणाऱ्या दोन व्यक्तींवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे एक गोंधळ झाला. तेव्हा पहिल्या माळ्यावरून अजून दोघे वाचवण्यासाठी तिथे पोहोचले. ते वाद मिटवायला आलेले असताना त्यांचाच या वादात मृत्यू झाला.
...
मेट्रोचा अडसर
येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या लगत असलेल्या रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे या इमारतीत जर प्रवेश करायचा झाल्यास पन्नास मीटरचा वळसा मारून इमारतीत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे जेव्हा दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली तेव्हा घटना रोखण्यासाठी स्थानिकांना इमारतीत प्रवेश करायला उशीर झाला. आरोपीला रोखण्यात त्यांना अपयश आले. येथील रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे जर मेट्रोचे काम सुरू नसते, तर इमारतीत प्रवेश करायला सोपे झाले असते आणि घटना रोखता आली असती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

SCROLL FOR NEXT