मुंबई

कडधान्याला महागाईची झळ

CD

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील उत्पादित कडधान्यांवर महागाईची वक्रदृष्टी पडल्याने कडुवाल, पावटे वाल, चवळी, मूग, मटकी, चना (हरभरा), तूर या उन्हाळी कडधान्यांचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचे भाव दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. गेल्या वर्षी १०० रुपये किलो असणाऱ्या कडुवालाचा भाव यावर्षी २०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मार्च-एप्रिल महिना हा वर्षभराच्या उन्हाळी कडधान्य साठवणुकीचा महिना म्हणून ओळखला जातो. तसेच विक्रमगड तालुक्यातील नागरिकांच्या दररोजच्या आहारात तूर, वाल या कडधान्यांना प्रथम पसंतीचे स्थान आहे. मार्च, एप्रिल महिन्यात वाल, पावटा वाल, चना (हरभरा), तूर, चवळी, मूग, मटकी या नवीन कडधान्याची बाजारात आवक होते. या कडधान्याचे भाव यंदा दुपटीने वाढलेले आहेत. यंदा वाल २०० रुपये किलो, चणा (हरभरा) ७० ते ८० रुपये, मूग ८० ते ९० रुपये, तूर १०० रुपये किलो असा देशी कडधान्याचा भाव वाढत चालेला आहे. या दरामुळे मात्र गृहिणींचे कडधान्य खरेदीचे बजेट कोलमडले आहे. महागाईची वाढती कुऱ्हाड कडधान्यावर कोसळ्याने घाऊक कडधान्य खरेदीचा कल कमी झाला आहे. आता असलेले कडधान्यांचे भाव मे महिन्यात आणखी वाढणार असल्याचे संकेत कडधान्य शेतकरी विक्रेत्यांनी दिले आहेत.

-----------------
वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. शेती करण्यासाठी लागणारे साहित्य, बियाणे, खते, मजुरी, वाढल्याने तसेच मुख्य म्हणजे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसानामुळे शेती करणे जिकरीचे झाले आहे. वाल, हरभरा, मूग, चवळी, तूर उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने सध्याचे कडधान्याचे भाव मे महिन्यापर्यंत आणखी वाढण्याचे संकेत आहे.
- सुनील सांबरे, शेतकरी, झडपोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT