मुंबई

पिकअप-ट्रक अपघातात एकाचा मृत्यू

CD

पेण, ता. ३ (वार्ताहर) : गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाल्याची घटना बुधवारी (ता. ३) पहाटे घडली. मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाट्यावर हा अपघात झाला. यात पिकअपची चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पिकअपचालक सुमीत चंद्रकांत खवळे (वय २८) हा देवगडवरून आंबे घेऊन येत होता. हमरापूर फाट्यावर हा पिकअप आला असता मागून आलेल्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. यात स्पृहा खवळे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच कल्पेश ठाकूर यांनी जखमीला पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या वेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, दादर सागरी पोलिस व पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT