मुंबई

एपीएमसीमध्ये गांजा विकणारा तरुण अटकेत

CD

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या शाहरूख अब्दुल शेख (३०) याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दाणा मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ५) रात्री झालेल्या या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचा १ किलो ५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा त्याने कुठून आणला, याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
एपीएमसी दाणा मार्केटच्या व्ही. गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांच्या पथकाने रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी धाव घेतली. या वेळी या ठिकाणी शाहरूख संशयास्पदरित्या वावरताना निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, पॅन्टच्या खिशामध्ये पाच प्लास्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये सुट्टे हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असे संलग्न असलेला सुमारे २० हजार रुपये किमतीचा १ किलो ५० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करत त्याने तो कुठून आणला, याबाबत चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी शाहरूखविरोधात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT