मुंबई

मेमोग्राफी व्हॅनच्या क्षमतेत वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : दिवसेंदिवस कर्करोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात महिलांमध्येही या आजाराची लक्षणे आढळत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या आजाराचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेने मेमोग्राफी व्हॅनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्त्रीरोग तज्‍ज्ञ डॉक्टरही या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
मेमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कॅन्सरची तपासणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने ही व्हॅन घेतली आहे. त्यानुसार ‘मागेल त्या ठिकाणी’ या व्हॅनच्या माध्यमातून शिबिरे आयोजित केली होती. यात महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. मागील वर्षभरात ३ हजार ३३९ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत केवळ आठ महिलांमध्ये चौथ्या टप्यातील गुणधर्म आढळली आहेत. तर तिसऱ्या टप्‍प्यातील १५३ महिलांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्‍प्यात ३ हजार १७८ महिलांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
दुसरीकडे नंदूरबारमध्ये १५० महिलांची आणि महाडमध्ये ५८ महिलांची तपासणी केली आहे. मेमोग्रॉफी व्हॅन ही महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठीच यापूर्वी उपलब्ध होती. परंतु इतर आजारांच्या महिलाही त्या ठिकाणी येत होत्या. त्यांच्यावर तेथे उपचार मिळत नव्हते; परंतु आता महिलांची ही अडचण दूर करत महापालिका आता या व्हॅनवर स्त्री रोग तज्‍ज्ञाचीही नेमणूक करणार आहे. त्यामुळे इतर आजारांची माहितीही त्यांना मिळणार आहे.
................................

गंभीर स्थितीतील आठ रुग्ण
मागील वर्षभरात या व्हॅनच्या माध्यमातून केलेल्या ३ हजार ३३९ तपासणीत कॅन्सरच्या गंभीर स्थितीतील आठ रुग्ण आढळले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरील १५३ आणि उर्वरित पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजच्या असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वांवर महापालिकेच्या माध्यमातून उपचार सुरू झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT