मुंबई

सुट्टीच्या हंगामात मुलांचा हिरमोड

CD

घणसोली, ता. १४ (बातमीदार)ः रबाळे पोलिस स्टेशनच्या जवळ असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. या उद्यानाला असलेल्या सुरक्षा भिंतीची पालिकेने डागडुजी केली आहे; पण उद्यानातील खेळणी मोडलेली असल्याने मुलांचा हिरमोड होत आहे.
महापालिकेच्या वतीने नवी मुंबई शहरामध्ये उद्याने उभारण्यात आलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत यापैकी अनेक उद्यानांची पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे. रबाळे रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानालादेखील पालिकेच्या याच अनास्थेचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्या या उद्यानाच्या सुरक्षा भिंतीची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली आहे. पण उद्यानातील खेळणी मोडलेली असल्याने चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. उद्यानामधील घसरगुंडी, सिसॉ, झोके तुटलेल्या अवस्थेत आहेत. अशातच सुट्ट्या लागल्या असल्याने लहान मुलांची उद्यानातील वर्दळ अधिक वाढली आहे. त्यामुळे तुटलेल्या खेळण्यांमुळे अपघात होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------
संध्याकाळी मुलांना उद्यानात आवर्जून खेळायला घेऊन येतो. मात्र, इथे खेळणी तुटलेली असल्यामुळे मुलांना खेळता येत नाही. पालिकेने उद्यानातील खेळणी लवकरात लवकर दुरुस्त करावी, जेणेकरून मुलांचा हिरमोड होणार नाही.
- मानसी साळवी, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT