मुंबई

आनंदनगर सबवे लवकरच होणार खुला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : पूर्व द्रुतगती महामार्गावरील भास्कर कॉलनी मार्गे ठाणे शहरात येण्यासाठी तसेच, कोपरी आणि भास्कर कॉलनीतून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्‍यांसाठी महत्वाचा ठरणाऱ्‍या सबवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सबवे खालील नाला आणि सर्व्हिस रोडला जोडणाऱ्‍या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने लवकरच हा सबवे ठाणेकरांसाठी खुला होणार आहे.
ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील सबवेचे काम एमएमआरडीए करीत असून त्या खालील नाल्याचे काम ठाणे महापालिका करीत आहे. या सबवेला आणि सर्व्हिस रोडला जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या सोबतच सबवेचे सुशोभीकरण केले जात आहे. नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर भराव टाकून रस्ता केला जाणार आहे. या सर्व कामांची पहाणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. हा रस्ता १५ जूनपर्यंत पूर्ण होण्यासाठी उर्वरित कामाचे नियोजन तशा पद्धतीने करावे. बांधकाम अवधी काही प्रमाणात कमी झाला तरी गुणवत्तेत मात्र तडजोड करू नये, असे आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले.
...
अर्धवट खोदकाम आणि मातीचे ढिगारे नकोत
मलनिस्सारण वाहिन्या आणि जल वाहिन्यांची जी कामे सुरू आहेत ते भाग ही पावसाळ्यापूर्वी वाहतूक योग्य करावेत. रस्ते मध्येच खणलेले, मातीचे ढिगारे पडलेले असे चित्र शहरात दिसायला नको, याची खबरदारी घ्यावी असेही आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक, योग्य बॅरिकेडिंग, पर्यायी रस्ता दर्शवणारा फलक, ट्रफिक वॉर्डनची उपस्थिती यात कोणतीही तडजोड करू नये, असे आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT