मुंबई

निवारा शेडअभावी प्रवाशांचे हाल

CD

नवीन पनवेल, ता. १६ (वार्ताहर)ः सध्या उन्हाचा पारा ४० अशांवर पोहोचला आहे. अशातच सायन-पनवेल मार्गावरील मार्बल मार्केटसमोरील तळोजा लिंक रोडवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे भरउन्हातच तासन् तास बसची वाट पाहत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
सायन-पनवेल महामार्ग नवी मुंबईतील सर्वात जास्त रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. कळंबोली, कामोठे, रोडपाली, खारघर या परिसरातून ठाणे, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्ते वाहतुकीने नोकरीधंद्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्ग महामार्गालगतच्या सर्व बस थांब्यांवर नेहमीच प्रवाशांनी गर्दी असते. परंतु, सायन-पनवेल महामार्गावरील बहुतांश ठिकाणी बस थांबे नाहीत. तर काही ठिकाणी असलेल्या थांब्याची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे या थांब्यावरील प्रवाशांना अर्ध्या रस्त्यावर येऊन उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------------
टोलवाटोलवीची उत्तरे
सायन-पनवेल मार्गावरील तळोजा लिंकरोड आहे. रोडपाली वसाहतीमधील नागरिक मुंबई, ठाणे, पनवेल व नवी मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणाहून बस मधून प्रवास करतात. त्यामुळे नेहमीच येथे प्रवाशांचा राबता असतो. असे असताना या मार्गावर शेड नसल्याने प्रवाशाचे हाल होत आहे. पावसाळ्यातही रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने निवारा शेड उभारण्याची मागणी होत आहे. या संदर्भात वाहतूक विभागाकडे विचारणा केली असता निवारा शेड बांधण्याचे काम महापालिका, सिडको किंवा रस्ते विकास मंडळाचे असल्याचे सांगण्यात येते.
--------------------------------------
लोकवस्ती नसल्याने लोकप्रतिनिधी उदासीन
सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात बस थांबे आहेत. ज्या ठिकाणी गरज नाही, अशा ठिकाणी राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते बसथांबे बांधताना दिसतात. परंतु, सायन-पनवेल महामार्गावरील तळोजा लिंकरोड लोकवस्तीच्या बाहेर असल्याने कुठल्याही लोकप्रतिनिधीने निवारा शेड वा बस थांबा उभारला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT