मुंबई

पालिका रुग्णालयांत स्वच्छतेला जोर

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांचा दौरा करण्याची शक्यता असल्याने गेल्या काही दिवसांपासून पालिका रुग्णालयांमध्ये स्वच्छता मोहीम जोरात सुरू झाली आहे. आतील वॉर्डपासून ते बाहेरील कॉरिडोअरपर्यंतचा परिसर कर्मचारी स्वच्छ करताना दिसून येत आहेत. यापूर्वी एका रुग्णालयभेटीच्या दरम्यान तेथील वसतिगृहाची अवस्था पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी एका अधिष्ठात्यालाच निलंबित केले होते. यामुळे रुग्णालय प्रशासनांनी आधीच सावध भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केईएम, सायन, कूपर तसेच नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाला भेट देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांतील स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. सर्व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना रुग्णालयातील स्थिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश दिले गेले असून, रुग्णालय आवारातील भंगार, मोडतोड आणि नको त्या गोष्टी हटवण्याच्या सूचनाही सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छतेची लाट उपनगरीय आणि तत्सम रुग्णालयांमध्येही पसरली आहे. येथील पंखे, खिडक्या, पायऱ्या आणि इतर उपकरणीय भागांची देखभाल केली जात आहे. दर महिन्याला अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना भेट देणे आवश्यक असताना तसे केले जात नसल्याची तक्रार एका अधिकाऱ्याने केली. या स्वच्छता मोहिमेतून तूर्तास ४०० किलो वजनाचे नको असलेले सामान बाहेर काढण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT