मुंबई

अमली पदार्थांच्या वाहतुकीला लगाम

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामांची तपासणी करावी. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा. अमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जाते. त्याचा परिणाम कुटुंबांवर होत आहे. त्यामुळे अशा पदार्थांना रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून विशेष यंत्रणा तयार करावी. यात अमली पदार्थांची वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने, गोदामे आहेत. अशा ठिकाणांचा वापर अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्योग विभागाकडून अशा बंद पडलेल्या, वापरात नसलेले कारखाने, गोदामांची माहिती घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यात यावेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नीलेश सांगडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार
पोलिस अधीक्षक देशमाने यांनी जिल्हा पोलिस यंत्रणांमार्फत अमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी केली असून बाहेर देशातून येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे देशमाने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT