नवीन पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या चौकडीपैकी एका सराईत चोरट्यास पोलिसांना ताब्यात घेतले आहे. महादेव उर्फ महादू सत्यगौडा (वय ३७, रा. कोपरखैरणे) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधून डिझेल चोरी करण्याचा प्रकार वाढला असल्याने पनवेल तालुका पोलिसांचे पथक मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय गळवे, पोलिस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, पोलिस नाईक पाटील व पोलिस शिपाई आकाश भगत, पोलिस शिपाई मासाळ आदींचे पथक एक्सप्रेस मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून काही व्यक्ती डिझेल चोरून पसार होण्याच्या तयारीत असताना या पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये इतर तिघेजण त्यांच्याजवळ असलेल्या स्विफ्ट गाडीतून चोरीच्या डिझेलसह पसार झाले; तर त्यांच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.