eknath shinde congress mumba  bmc
eknath shinde congress mumba bmc  sakal
मुंबई

Mumbai Politics: काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा, Chinmay Jagtap

Mumbai Politics: माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दक्षिण मुंबईतील तीन माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत.

माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहांना रिझवान खान आणि राबिया शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. (eknath shinde congress corporetors mumbai)

आतापर्यंत काँग्रेसमधील सहा नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षांत पक्ष प्रवेश सुरू झाले आहेत. आज दक्षिण मुंबईतील मिलिंद देवरा समर्थक तीन माजी नगरसेविकांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या विभागात चांगले काम करायचे असल्यामुळे या नगरसेवक आपल्यासोबत येत आहेत. त्यांनी जो विश्‍वास माझ्यावर दाखवला आहे. तो सार्थ ठरेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आपले सरकार सर्वसामान्यांचे आहे.(milind devra politics in mumbai)

जनतेला आमच्यावर विश्‍वास आहे. त्यामुळेच रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सरकारने जे लोककल्याणकारी काम दीड वर्षांत केले, ही त्याचीच पोचपावती आहे, असे शिंदे म्हणाले.

ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे, त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या विभागात जास्तीत जास्त विधायक कामे करण्याची संधी मिळेल, असे माजी खासदार देवरा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT