मुंबई

Navi Mumbai : गणेश नाईकांबद्दल अपशब्द काढल्यास नवी मुंबई पेटून उठेल, भाजप आणि शिंदे गटात वाक्‌युद्ध

नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाक्‌युद्ध सुरू झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

CD

Navi Mumbai Politics: गणेश नाईक यांच्याविषयी बोलताना जपून बोलावे. त्यांच्याबद्दल अपशब्द काढल्यास नवी मुंबई पेटून उठेल, असा इशारा भाजपचे नेते अनंत सुतार यांनी दिला आहे.

त्यावर जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाहीत त्यांच्यावर काय बोलावे, अशी टीका शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी केली आहे. यामुळे नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाक्‌युद्ध सुरू झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

नवी मुंबईत सुरू असलेली हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल,असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी आमदार गणेश नाईक यांच्याबाबत बोलताना काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर नाईक यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्यास नवी मुंबई पेटून उठेल, असा इशारा भाजपचे अनंत सुतार यांनी दिला.(navi Mumbai News )

. तसेच, विजय चौगुले हे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत निवडून येत नाहीत, अशी थट्टाही केली होती. याला प्रत्युत्तर देताना सुतार हे नगरसेवक म्हणूनही निवडून येत नाहीत, असे वक्तव्य चौगुले यांनी केले. त्यामुळे हा वाद पाहता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. यावर वरिष्ठ नेते कशाप्रकारे समेट घडवून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Navi Mumbai politics)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिमुकल्यांसाठी धमाल घडवणारं नाटक रंगभूमीवर; 'माकडचाळे' बालनाट्याचा दिवाळीत होणार शुभारंभ; माकडाच्या भूमिकेत कोण दिसणार?

Pune Police : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगार तडीपार

Pregnancy Nutrition Tips: ए. जी. ई म्हणजे नेमकं काय? गरोदरपणावर त्याचा काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

"अन् पायावरून बसचं चाक गेलं" हार्दिकने सांगितली त्याच्या अपघाताची गंभीर घटना ; "फक्त स्वामींमुळे.."

PMC Employees : तारखेच्या वादाने १७०० जणांचा बोनस अडकला; कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT