मुंबई

मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

CD

मुंबई, ता. १६ : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पार पडली. 
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ आणि मतदान यंत्रे मतदारसंघनिहाय ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या वेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी संदीप निचित यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
क्षीरसागर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया संगणकीय पद्धतीने पूर्ण करण्यात आली. सरमिसळ याद्या तयार झाल्या असून विधानसभा मतदारसंघनिहाय बोरिवलीतील राजेंद्रनगर येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात मतदान यंत्रे संबंधित विधानसभेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होईल. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे चार, तर एका मतदारसंघाचा अंशत: समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश असून सात हजार ३८० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे बॅलेट युनिट ८,८४५, कंट्रोल युनिट ८,८४५, व्हीव्हीपॅटची ९,५८१ एवढी आवश्यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT