मुंबई

उरणमध्ये रामजन्मोत्सवाचा उत्साह

CD

उरण, ता. १७ (वार्ताहर) : श्री रामनवमी उत्सव विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भाविकांनी आपापल्या कुटुंबासह प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. उरण शहर, चिरनेर, फुंडे, चिर्ले, दिघोडे, खोपटा गावात श्रीरामाची जागृत मंदिरे आहेत. या मंदिरांत दरवर्षी श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मंदिरात सकाळी ५ वाजता अभिषेक, काकड आरती, कीर्तन, भजन, रामजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रामजन्माचा पाळणा सजवून महिलांनी पाळणा गीत गायिले. उरण तालुक्यातील फुंडे येथील अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिराचा जीर्णोद्धार तीन दिवस आगोदर करण्यात येऊन श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तीन दिवस या मंदिरात कीर्तन, भजन, हरिपाठ असे विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळी श्री रामाचा पालखी सोहळा पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT