मुंबई

... अन आयुक्तांचा पाहणी दौरा झाला रद्द

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी आज (ता. २३) आयुक्त मुख्यालयातील विविध विभागांना भेट देणार होते. त्यामुळे कार्यालयांच्या स्वच्छतेसह नीटनेटकेपणाही दिसून आला; मात्र आयुक्त या विभागांत फिरकलेच नाहीत. त्यामुळे बुधवारी पुन्हा आयुक्त कधीही पाहणी करतील, अशी चिंता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावू लागली आहे.
तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छतेसह पालिका अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहण्याची शिस्त लावली होती. त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सौरभ राव यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी कामाची धुरा हाती घेताच विविध विभागांना भेटी देत, पाहणी करण्यास सुरुवात केली. त्याच धर्तीवर राव यांनी मंगळवारी मुख्यालयातील सर्व विभागांचा पाहणी दौरा करणार होते. त्यामुळे मुख्यालयात सकाळी ९.३० च्या आधीपासून कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते. आयुक्तांची कार्यालयाला भेट होणार म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय स्वच्छ ठेवण्याबरोबर, सर्व फाईल्स नीटनेटक्या ठेवण्याच्या व प्रत्येकाने गणवेशात येण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्मचारी आयुक्तांच्या भेटीकडे डोळे लावून होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाल्यामुळे बुधवारी आयुक्त पुन्हा विभागांना भेट देतील, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT