मुंबई

बँक खात्यासह पासवर्ड शेअर केले नसताना ऑनलाईन फसवणुक

CD

वृद्ध महिलेला साडेपाच लाखांचा गंडा
- अंधेरीतील घटना; पासवर्ड दिला नसतानाही फसवणूक
अंधेरी (बातमीदार) ः कोणालाही बँक खात्यासह पासवर्ड शेअर केले नसताना अज्ञात सायबर ठगाने एका ६३ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह तिच्या मुलाच्या बँक खात्यातून सुमारे साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
३१ वर्षांचा तक्रारदार तरुण वृद्ध आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे त्याच्या आईसोबत एका खाजगी बँकेत खाते आहे. १८ एप्रिलला तो त्याच्या अंधेरीतील कार्यालयात होता. यावेळी त्याला त्याच्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये डेबिट झाल्याचा एक मेसेज आला होता. त्याने त्याच्या आईला पैशांबाबत विचारणा केली होती. यावेळी तिने बँकेतून ही रक्कम काढली नसल्याचे तसेच तिला अडीच लाखांबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने बँकेत जाऊन विचारपूस केली होती. यावेळी त्याला त्याच्या वयोवृद्ध आईसह त्याच्या बँक खात्यात सुमारे साडेपाच लाख रुपये काढून अज्ञात सायबर ठगाने त्यांची फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, पासवर्ड कोणालाही शेअर केले नव्हते. तरीही त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम इतर बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT