मुंबई

प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौरप्रकाश

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच अनेकदा ग्रामीण भागात सुरू असलेल्या विजेच्या लपंडाव तसेच निधीअभावी वीजबिल अदा न कल्याने खंडित होणारा वीजपुरवठा याची दाखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सौर प्रकाशाने उजळणार आहे. तसेच विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.

ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९० उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागात या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गरीब रुग्णांना योग्य व उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार आहे. यात रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीपासून ते मुबलक प्रमाणात औषधे, विविध आजारांवरील इंजेक्शन, लस आदींची उपलब्धता करून देण्यात येणार आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विजेचा सुरू असलेला लपंडाव, वीज देयक न भरल्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडतात. अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना योग्य सेवा पुरवण्यात अडथळा निर्माण होत असतो. तर वीज बिलदेयके अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यास निधीची तरतूद होईपर्यंत वीजबिल रखडतात. ही बाब लक्षात घेत ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सौरपॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही सुविधा देण्यात येणार आहे.

चार आरोग्य केंद्रात तांत्रिक अडचणी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३३ पैकी २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौरऊर्जेची सुविधा देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित चार आरोग्य केंद्रांना ही सुविधा देण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. यात अनेक रुग्णालयांचे बांधकाम जुने आहेत. तर काही रुग्णालय शाळेत अथवा इमारत सुस्थितीत नसल्याने त्यावर सोलर सिस्टम बसवण्यात अडचणी येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT